अजिंठा येथे जयदीप सुरवसे यांना शहीद भगतसिंग युद्ध राष्ट्रीय पुरस्कार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : अजिंठा येथे जयदीप सुरवसे यांना शहीद भगतसिंग युद्ध राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला. 

ग्रामपंचायत कार्यालय अजिंठा येथे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत जयदीप सुरवसे व साहेबराव पाटील शेळके, विस्तार अधिकारी तथा प्रशासक ग्रामपंचायत अजिंठा यांनी अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक सत्कार शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केला. 

यावेळी उपस्थित मान्यवर नजीर गाईड सरपंच तारेखभाई चाऊस, सदस्य रुग्ण कल्याण समिती मेघराज चोंडीये, ग्रामपंचायत सदस्य आजम खान सुकेडे ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र झलवार पाणीपुरवठा कर्मचारी संदीप झलवार शेख मतीन ग्रामपंचायत कर्मचारी शेख राजिक पैलवान व गावकरी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी जयदीप सुरवसे यांनी पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या व वरील सर्व मान्यवरांचे आभार मानले.